संकल्पना व संवादक – नचिकेत जोशी, ACB, ALB Toastmasters club
कार्यशाळेचा हेतू: सहभागी विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य विकसित करणे.
कोण सहभागी होऊ शकते? – ज्याला स्वत:चे संवादकौशल्य विकसित करायचे आहे, असा कोणीही.
कार्यशाळेचे प्रकार:
१. ‘वक्ता व्हा व्यक्त व्हा – बेसिक’ – इयत्ता आठवी पासून महाविद्यालयीन विद्यार्थी (स्वतंत्र कार्यशाळा), व्यावसायिक, गृहिणी (स्वतंत्र कार्यशाळा)
२. ‘वक्ता व्हा व्यक्त व्हा – सूत्रसंचालन स्पेशल’ – सर्वांसाठी
३. ‘वक्ता व्हा व्यक्त व्हा – मुलाखत स्पेशल’ – सर्वांसाठी
भाषामाध्यम: प्रामुख्याने मराठी. हिन्दी आणि इंग्रजी optional.
कार्यशाळेचे थोडक्यात स्वरूप: नावनोंदणी करताना आधी एक प्रश्नावली दिली जाईल. सहभागी विद्यार्थ्यांच्या उपलब्ध कौशल्याचा अंदाज घेण्यासाठी ही प्रश्नावली असेल. प्रत्यक्ष कार्यशाळेत मार्गदर्शकाचे सेशन्स, सहभागी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद, गटचर्चा, सादरीकरण हयाद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. संवादकौशल्य हा प्रामुख्याने सरावाचा भाग असल्याने कार्यशाळेत जास्त भर हा practical वर दिला जाईल.